Showing posts with label Godavari. Show all posts
Showing posts with label Godavari. Show all posts

Thursday, March 17, 2016

श्री क्षेत्र नाशिक – सिंहस्थ कुंभमेऴा महापर्व



श्री क्षेत्र नाशिक – सिंहस्थ कुंभमेऴा महापर्व



हरिद्वारे प्रयागे च धारा गोदावरीतटे ।।

सिंहस्थिते ज्ये सिंहर्के नासिके गौतमी तटे ।।1।।

-    (स्कंद पुराण)

       हरिद्वार, प्रयाग, नासिक आणि उज्जयिनी या चार पवित्र क्षेत्री अमृत बिंदूचे सिंचन झाल्यामुळे याचठिकाणी कुंभपर्व साजरे केले जाते, अन्यत्र नाही.
नासिक हे पुरातन प्रसिद्ध हरिहर क्षेत्र आहे. सिंह राशी मध्ये जेव्हा गुरूचे आगमन होते, तेव्हा सिंहस्थ पर्व काल साजरे केले जाते. या सिंहस्थ पर्वकाळात तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दान, प्रायश्चित, गंगाभेट तसेच पितृगणानिमित्त तीर्थश्राद्ध विधि, नारायण नागबली, त्रिपिंडी, वेदपारायण, भागवत सप्ताह, विष्णुयाग, महारूद्रयाग, कथा कीर्तन, प्रवचने, अनुष्ठाने इत्यादी धार्मिक विधि करण्याची प्राचीन परंपरा आहे. या पर्वकाळात देशभरातून अनेक अध्यात्मिक गुरू देखिल शिबिर, सत्संग आयोजित करतात. म्हणून आपण सर्वांनी या पर्वकाळाचा लाभ घेतला पाहिजे. 

नासिकं च प्रयागं च नैमिषं पुष्करं तथा।।

पंचमं च गयाक्षेत्रं षष्ठं क्षेत्रं न विद्यते।।

-    (ब्रम्हांड पुराण)

नासिक, प्रयाग, नैमिष, पुष्कर आणि गया हीच पाच प्रमुख पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. इतर कोणतेही सहावे तीर्थक्षेत्र नाही. (नासिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जयिनी) या चार क्षेत्रांतच कुंभमेळा भरतो. श्री क्षेत्र नासिक येथे पंचवटीत गोदावरी (गौतमी) दक्षिणवाहिनी आहे. सिंहस्थ महापर्वकाल एक वर्षापर्यंत असतो. अनादीकाळापासून नासिक पंचवटी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. पंचवटी येथे रामकुंड तर श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ या ठिकाणी शाहीस्नान केले जाते. यावेळी श्री गोदावरीच्या अति पुण्यदायक स्नान तसेच ध्वजपर्व च्या पावन प्रसंगंचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण भारततातून हजारो बैरागी, उदासी, निर्मोही, निर्वाणी, दिगंबर, खालसा, गुरूद्वारा, खाकी, रामानुजी, दसनामी इ. साधु, संत, महंत, सत्पुरूष तसेच भारताच्या कानाकोपरेतून असंख्य भाविक श्रद्धावान, धार्मिकजन यात्रेकरू पूर्व प्रचलित परंपरेनुसार स्नान व दानाच्या महापुण्याचा लाभ घेतात. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणूकांचे नयनमनोहर दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते.


सिंह राशीमध्ये गुरू ग्रह जोपर्यंत राहतो, तोपर्यंत हे महापर्व चालते. सर्व तीर्थ, नद्या, समुद्र, क्षेत्र, अरण्य, ऋषी, महर्षी, आश्रम, विहिरी, जलाशय, पल्लव एवढेच नव्हे तर इन्द्रासह तेहेतीस कोटी सर्व देवता सुद्धा एक वर्षापर्यंत श्री गोदावरीच्या तटावर निवास तसेच नित्य स्नान करतात. दक्षिणवाहिनी गोदावरीच्या पवित्र जलात स्नान केल्याने अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्यफल प्राप्त होते. अशा या अनन्य साधारण अध्यात्मिक, धार्मिक महत्त्व असलेल्या सिंहस्थ पर्वकाळात परिसरात असलेल्या चैतन्यलहरींची अनुभूती शब्दांत सांगता न येण्यासारखी असते.


Hindi - श्री क्षेत्र नासिक – सिंहस्थ कुंभमेला महापर्व



श्री क्षेत्र नासिक – सिंहस्थ कुंभमेला महापर्व



हरिद्वारे प्रयागे च धारा गोदावरीतटे ।।

सिंहस्थिते ज्ये सिंहर्के नासिके गौतमी तटे ।।1।।
-    (स्कंद पुराण)

हरिद्वार, प्रयाग, नासिक और उज्जैन इन चार पवित्र क्षेत्रों में ही अमृत की बुँदों के गिरने केकारण कुंभ पर्व मनाया जाता है, अन्यत्र नहीं।
नासिक ही पुराण प्रसिद्ध हरिहर क्षेत्र है। सिंह राशी में जब गुरू का आगमन होता है, तब सिंहस्थ पर्व काल मनाया जाता है। इस सिंहस्थ पर्व काल में तीर्थयात्रा, तीर्थ स्नान, दान, प्रायश्चित तथा पितृगणानिमित्त तीर्थ श्राद्ध विधि, नारायण नागबली, त्रिपिंडी आदि धार्मिक विधि करने की प्राचीन परंपरा है। अतः इस पर्व काल का सब भाविकोने लाभ उठाना चाहिए। 

नासिकं च प्रयागं च नैमिषं पुष्करं तथा।।

पंचमं च गयाक्षेत्रं षष्ठं क्षेत्रं न विद्यते।।

-    (ब्रम्हांड पुराण)

नासिक, प्रयाग, नैमिष, पुष्कर और गया यहीं पाँच प्रमुख पावन तीर्थ क्षेत्र हैं। इनके अलावा छटा तीर्थ क्षेत्र और कहीं भी नहीं। (नासिक, हरिद्वार, प्रयाग तथा उज्जैन) इन चार क्षेत्रों में ही मनाया जाता है। श्री क्षेत्र नासिक पंचवटी में गोदावरी दक्षिण वाहिनी है। सिंहस्थ पर्वकाल एक साल तक होता है। अनादी काल से नासिक पंचवटी में सिंहस्थ पर्व मनाया जाता है। उस समय श्री गोदावरी के अति पुण्यदायक स्नान तथा ध्वजापर्व का अवसर प्राप्त करने के लिए अखिल भारतवर्ष से हजारो बैरागी, उदासी, निर्मोही, निर्वाणी, दिगंबर, खालसा, गुरूद्वारा, खाकी, रामानुजी, दसनामी इ. साधु, संत, महंत, सत्पुरूष तथा भारत के कोने-कोने से असंख्य भाविक श्रद्धावान, धार्मिकजन पूर्व प्रचलित रीतिरिवाजों के अनुसार स्नानदान का महापुण्य का लाभ उठाते हैं। शाही जुलुसका यह नयनमनोहर दृश्य अपूर्वंहि ज्ञात होता है।
बृहस्पति का सिंह राशी में जब तक निवास रहता है तब तक जगत के सर्व तीर्थ, नदीयाँ, सागर, क्षेत्र, अरण्य, ऋषी, महर्षी, आश्रम, कुएं, जलाशय, पल्लव इतनाही क्या इन्द्रादि तैतीस कोटी सर्व देवता भी एक वर्ष तक श्री गोदावरी के तीरपर निवास तथा नित्य स्नान करते हैं। अतः दक्षिण वाहिनी गोदावरी के स्थानपर स्नान करने से अश्वमेध यज्ञ का पुण्यफल प्राप्त होता है।


Wednesday, March 16, 2016

History of name- Nashik



नमस्कार

डेस्टिनेशन नाशिक वर आपले स्वागत आहे.

आपले नाशिक


नाशिक शहर पुरातन काळापासून विविध नावांनी ओळखला जात असे. महाराष्ट्राच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहराला जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी नावे होती असे उल्लेख आढळतात. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असे नाव पडले असावे तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना रावणाची बहिण शूर्पणखाचे  नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे.
गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभमेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभमेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिकमध्ये आणि नाशिकजवळ अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथे स्वातंत्र्यविर सावरकर, कुसुमाग्रज, दादासाहेब फाऴके, अनेक प्रसिद्ध व्यक्ति होऊन गेल्या.
             अशा प्रकारे केवऴ धार्मिक स्थऴ म्हणूनच नव्हे तर नाशिक हे ऐतिहासिक, औद्योगिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारे माझे नाशिक, तुमचे नाशिक, आपण सर्वांचे नाशिक.