जागतिक चिमणी दिन
या चिमण्यांनो,
परत फिरा रे....
घराकडे आपुल्या.....
निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वा़टू लागली आहे. शहरात मातीच्या भिंती, कौलारू घरे पहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला आता दिसत नाही, अंगणही राहिले नाही तर अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी , बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सीमेंटच्या जंगलात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. अपवादाने वृक्ष नजरेस पडतात.
"नेचर फॉरेव्हर सोसायटी‘ या संस्थेच्या पुढाकाराने हा दिवस साजरा करायला 2010 मध्ये सुरवात झाली. पहिल्याच वर्षी जगभरातून या मोहिमेला प्रतिसाद
मिळाला. पहिला जागतिक चिमणी
दिवस - २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. तेव्हापासून मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून दरवर्षी पाळला जातो. चिमण्या
पुस्तकात उरतील... चिमण्या कवितेत उरतील... ज्या
विलक्षण वेगाने चिमण्या नाहीशा होत आहेत; त्या गतीने हा भयावह भविष्यकाळ अगदीच अशक्य राहिलेला नाही, हे आजचे वास्तव आहे. आज
"जागतिक चिमणी दिन‘ साजरा होत असताना "परत फिरा रे...‘ अशी चिमण्यांना आर्त आळवणी करण्याची वेळ माणसांवर आली आहे...
नाशिकमधील स्तुत्य उपक्रम
नाशिक महापालिकेने चिमण्यांच्या संवर्धनासाठी एक अतिशय स्तुत्य निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे घर बांधणीची परवानगी देताना चिमण्यांना घरटे करण्यासाठी बाहेरून एक भोक ठेवणे बंधनकारक आहे. त्याचे भान आता प्रत्येक नागरिकाने घर बांधणीच्या वेळी ठेवायला हवे. नाशिकमधीलच हिरवळ फौंडेशनने चिमण्यांसाठीची देखणी "घरे‘ बनविली आहेत.
चिमण्यांनाही द्या जागा...
- फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडते.
- घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यांना चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगले तर तेथे चिमण्या घरटे करतील.
- शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकतो.
- फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडते.
- घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यांना चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगले तर तेथे चिमण्या घरटे करतील.
- शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकतो.
- घराजवळच्या मोकळ्या भूखंडावर, कॉलनीतील रस्त्यांच्या कडेला लहान झुडुपवर्गिय रोपांची लागवड करा. व संवंर्धन करा.
- चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी बाभूळ वृक्षाची लागवड व संवर्धन करा. यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बाभूळावर त्या आनंदाने वास्तव्यास असतात.
- घराच्या टेरेस, बाल्कनीत कुंड्यात जेथे झाडे लावलेली आहेत अशा जागी बर्ड फिडर लावा. चिवचिवाटाने भकास, ओसाडपणा जाऊन जागेच्या सौंदर्यात भरच पडेल.
जसे चिऊताईचे तसेच लव्ह बर्डचे पण होत आहे. निसर्गाची शोभा वाढवणारे हे सुंदर रंगबिरंगी पक्षी आता सिमेंटच्या जंगलात पिंजरात बंदिस्त ठेवण्यात येतात. अनेकांना आपण किती पर्यावरण प्रेमी व पक्षी प्रेमी आहोत याचे प्रदर्शन मांडायची हौस असते. असे लोक असे पक्षी विकत आणून ठेवतात. मोकळ्या वातावरणात बागडणारे हे पक्षी कोंडमारा होऊन व त्यांची योग्य काळजी न घेतल्याने 2-3 महिन्यातच मरून जातात. पक्षांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवा.
चिमण्यांचे
वास्तव्य धोक्यात आलेले आहे.
चिमण्या वाचवा, जग वाचवा.
good artical
ReplyDeleteKhup chhan. Mala margdarshan kara , mala he ajun karaychey.
ReplyDeleteThanks
Deleteउन्हाळ्यात खिडकी बाहेर पक्ष्यांसाठी एक वाटी पाणी ठेवले तरी खूप मदत होते.