नमस्कार
‘डेस्टिनेशन नाशिक’ वर
आपले स्वागत आहे.
आपले नाशिक
नाशिक शहर पुरातन काळापासून विविध
नावांनी ओळखला जात असे. महाराष्ट्राच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहराला जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद,
आणि
विद्यमान नाशिक अशी
नावे होती असे उल्लेख आढळतात. रामायणात
नाशिक
परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम
वास्तव्यास
होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे
शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात
होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे
पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर"
म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असे नाव पडले असावे तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी
आहे. राम, त्यांची
पत्नी सीता
आणि
बंधु लक्ष्मण
नाशिक
मधील पंचवटी
परिसरात
वास्तव्यास असताना रावणाची बहिण शूर्पणखाचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका')
लक्षमणाने
या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले
असेही म्हणतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे.
गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
आहे. नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभमेळा
नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि
त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभमेळ्यासाठी
साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष
व
कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा
व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर
नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे
धरण नाशकात गंगापूर
येथेच
आहे. महाराष्ट्रातल्या शेती आणि
औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते मुंबई,
पुणे
शहरांखालोखाल
महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिकमध्ये आणि नाशिकजवळ
अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथे स्वातंत्र्यविर सावरकर, कुसुमाग्रज, दादासाहेब
फाऴके, अनेक प्रसिद्ध व्यक्ति होऊन गेल्या.
अशा
प्रकारे केवऴ धार्मिक स्थऴ म्हणूनच नव्हे तर नाशिक हे ऐतिहासिक, औद्योगिक,
सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारे माझे नाशिक, तुमचे नाशिक,
आपण सर्वांचे नाशिक.
No comments:
Post a Comment