Saturday, March 26, 2016

नाशिक : गड - किल्ले



नाशिक : गड - किल्ले


नाशिक जिल्ह्यातील दुर्ग संपदेची धावती ओळख करून देण्याचे हे प्रयत्न आहे. गड – किल्ले म्हटले म्हणजे राजगड, सिंहगड. रायगड अशी नावे डोळ्यासमोर येतात. रायगड प्रत्यक्ष शिवरायांचा राजदुर्ग तर राजगड हा दुर्गांचा राजा असे त्यांचे महत्त्व निर्विवाद आहे. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगात असे काही दुर्ग आहेत की ज्यांची ओळख मराठी माणसाला घडणे जिव्हाळ्याचे आहे. 
सह्याद्री पर्वतरांग डांग पासून ते गोव्यापर्यंत पसरली आहे. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे सह्याद्रीची उंची कमी कमी होत जाते. त्यामुळे नाशिक जिल्हायातील अनेक दुर्गांची समुद्रसपाटीपासून उंची ४००० फुटापेक्षा अधिक आहे. सह्याद्रीतील अत्युच्च शिखर कळसूबाई (५४२७ फुट) नाशिक – नगर जिल्हाच्या सरहद्दीवर आहे.
सह्याद्रीत सर्वाधिक उंचीवर असलेला किल्ला पर्णालपर्वत ग्रहणाख्यान या ग्रंथात ज्याचे वर्णन सह्याद्री मस्तकः असे केले आहे तो साल्हेर किल्ला (५२९५ फुट) नाशिकमध्येच आहे.

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीची मुख्य पर्वतरांग व त्यास जोडणारे उपरांगा, त्यातील किल्ले, दुर्गांची खालीलप्रमाणे वर्गवारी आहेत.
(१) सालबारी पर्वतरांग
साल्हेर उपरांग –   १) भिलाई २) साल्हेर ३) सालोटा ४) हरगड ५) मुल्हेर – मोरागड                               ६) न्हावी   रतनगड ७) हनुमान गड 
दोधेश्वर उपरांग –  १) कर्हा २) अजमेरा ३) बिष्टा (बिजोरा) ४) दुंधा  
गाळणा उपरांग –   १) पिसोळ २) देरमाळ ३) कंकराळा ४) गाऴणा
चणकापुर उपरांग १) पिंपळागड (कंडाळ्या) २) प्रेमगिरी ३) चौलेर
(2) सातमाळा पर्वतरांग
सातमाळा उपरांग१) मेसण्या २) चांदवड ३) इंद्राई ४) राजघेर ५) कोळघेर                                     ६) कांचन-मांचन ७) धोडप ८) रावळ्या – जावळ्या ९) मार्कंडेय                                 १०) कान्हेरा ११) अहिवंत – महिवंत १२) अचला १३) हातगड
मानगड उपरांग –  १) जातेगाव (महादेव डोंगर) २) माणिकपुंज ३) अंकाई- टंकाई                                 ४) कनकगिरी (कांत्रा)
(३) सह्याद्री पर्वतरांग
नाशिक उपरांगवायव्येस) रामशेज २) भोरगड
              नैऋत्येस – १) बहुला २) रायगड ३) गड गड्या (घारगड)
      त्रिंबकेश्वर उपरांग – १) रांजण गड २) अंजनेरी ३) ब्रम्हगिरी ४) हरिहर ५) भास्कर गड
      इगतपुरी उपरांग –  १) कावनई २) त्रिंगलवाडी
      कळसुबाई उपरांग – १) अलंग २) मदनगड ३) कुलंग ४) मोरधन
      औंढापट्टा उपरांग –  १) बीटन गड २) औंढा ३) पट्टा ४) आड                                                 ५) सोनगड ६) प्रतापगड ७) डूबेरगड
      पेठ उपरांग –      १) वाघेरा २) खैराई ३) सोनगिरी 

       विविध उत्खननातून हे सिद्ध झाले ३०० वर्षांचा इतिहास उपलब्ध आहे. सह्याद्रीतील दुर्गांच्या घडणीत सातवाहन पासून ब्रिटिशांपर्यंत विविध राज्यकर्त्यांचा हातभार लागला आहे.
      मराठेशाहीमध्ये शिवकाल व पेशवेकाल असे दोन भाग आहेत. यापैकी शिवकाल हा किल्ल्यांचा सुवर्णकाल होय. शिवकालातील राजगड, तोरणा, सिंहगड, रायगड, पन्हाळा इ. किल्ल्या इतके नाशिक मधील किल्ले गाजलेले नसले तरी साल्हेर, रामशेज, गाळणा, अहिवंत, पट्टा या किल्ल्यांचा अविस्मरणीय इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या चरणांचा स्पर्श घडण्याचा मान पट्टा म्हणजेच विश्राम गड याला.
      पेशवाई काळात किल्ल्यांचे महत्व तुलनेने कमी झाले. माधवराव पेशव्यांचे धोदाप्चे युद्ध या काळातील अविस्मरणीय घटना म्हणता येईल.

No comments:

Post a Comment