Tuesday, March 22, 2016

होळीच्या शुभेच्छा

       होळी उत्सव

  होळी उत्सव हा महाराष्ट्रातील खूप जुना उत्सव आहे. या दिवसासोबत भक्त प्रल्हाद यांच्या भक्तीची गाथा जुळलेली आहे. राजा हिरण्यकश्यपु यांचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा चांगलाच भक्त होता. हिरण्यकश्पुने कठोर व्रत करून ब्रम्हा देवा कडून अजरामर होण्याचे वरदान मिळवले होते. त्या वरदानामुळे त्याला त्याचा कोणत्याही शत्रुकडून आणि अस्त्राकडून धोका नव्हता. तेव्हापासून तो स्वतःलाच देव समजत होता. आणि आपलीच पूजा करायला भाग पाडत होता. त्याच्या राज्यात फक्त त्याचीच भक्ती केली जात होती. कोणी त्याच्या आदेशाचे पालन नाही केले तर कठीण सजा मृत्यू दंड  होत असे. अशा परिस्थितीत भक्त प्रल्हादचा जन्म झाला आणि सर्व परिसर हा विष्णू भक्ती मध्ये लीन झाला. प्रल्हाद यांस लहानपणापासून देवभक्तीची ओढ होती, ते नेहमी विष्णू भक्तीत लीन राहायेचे. जेवा हिरण्यकश्यपुला समजले कि आपला मुलगा हा वाम मार्गाला म्हणजेच विष्णूच्या नादाला लागला आहे. तेव्हा त्याने प्रल्हादाला समजावले माझ्यापेक्ष्या कोणीही मोठा नाही मलाच देव मान, तो विष्णू माझ्यासमोर काहीच नाही. मी अजरामर आहे. सर्व देव मला मानतात. प्रल्हाद ऐकायला तयार नव्हता, त्याला राजपाट  आणि राक्षसी वृतीत रस नव्हता. हिरण्यकश्यपुने त्याची बहिण होलिका हिला बोलविले आणि आदेश केला. ती म्हणाली दादा तू चिंता करू नकोस मला वरदान आहे, मी कधीही अग्नीचा भक्ष बनणार नाही. तू लाकडांची होळी तयार कर, येणाऱ्या पौर्णिमेला प्रल्हाद याला मांडीवर घेवून मी बसेन. त्याचा अंत करून देव तूच आहेस हे सिद्ध करीन. शेवटी तो दिवस आला. अग्नी लावण्यात आली, पाहतात तर काय आग भडकली प्रल्हाद आपले विष्णू नामस्मरणात लीन होते. एकदम होलिका ओरडायला लागली. मी जळतेय वाचवा, वाचवा. आणि होलिका जाळून राख झाली. त्या सोबत तिचा गर्व ही नाश पावला. तिला वरदान होते तिच्या बचावासाठी, पण तिने त्याचा दुरुपयोग केला म्हणून तिचा अंत झाला. भक्त प्रल्हाद सुखरूप होता
            होळी हा उत्सव  हेच सांगतो, सगळे वाईट विचार आचार हे होळी सोबत दहन करा आणि चांगेल गुण धारण करा


होळीच्या पवित्र आग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो.
व सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो.

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

No comments:

Post a Comment