हनुमान जयंती
मारुती जन्माचा इतिहास -
जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तीमान आहे.
कठोर आराधनेमुळे अंजनाच्या पोटी शंकराचा जन्म - मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो.
ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रतीक असलेला हनुमंत ! - हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक) सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.
उत्सव साजरा करण्याची पद्धत - महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त का करावा ?
`हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीत जास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.
॥ मारुति स्तोत्र ॥
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी (धूर्त) दूत वैष्णव गायका ॥२॥
दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें
। काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे
दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी
कुंडलें बरीं । सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे
उत्तरेकडे । मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके
। तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिले डोळां ग्रासिलें
सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥
॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम ॥
॥ श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् ॥
||Maruti stotra||
Bhimroopi
maharudra, Vajrahanuman maruti | Vanari anjanisoota, ramdoota prabhanjana || 1
||
Mahabali
pranadata, sakala uthavi bale | Saukhakari dukhahari, dhoort vaishnav gayka ||
2 ||
Dinanatha
hareeroopa, sundara jagadantara | Patal devatahanta, bhavyasindurlepana || 3 ||
Lokanatha
Jagannatha, prananatha puratana | Punyavanta punyashila, pavna paritoshka || 4
||
Dhwange
uchali baho, aaveshe lotala pudhen | Kalagnee, kalrudragnee, dekhta kampati
bhaye || 5 ||
Brahmande
maieli neon, amvale dantpamgati | Netragnee chalilya jwala, bhrukuti tatheelya
bale || 6 ||
Puchchha
te murdile matha, keeriti kundale bari | Suvarna katee kasoti, ghanta kimkini
nagara || 7 ||
Thakare
parvata aiesa, netka sadpatalu | Chaplang pahta mothe, mahaveedyullatepari || 8
||
Koteechya
kotee uddane, zepave uttarekade | Mandradri sareekha dronoo, krodhe utpateela
bale || 9 ||
Aaneela
maguti nela, Aala gela manogati | Manasi takeele maage, gatisi tulna nase || 10
||
Anupasonee
brahmanda aevadha hot jatse | Tayasi tulna kothe, meru mandar dhakute || 11 ||
Brahmandabhovate
vedhe, vajrapuchchhe karu shake | Tayasi tulna kaichi,brahmandi pahata
nase||12||
Aarakta
dekhile dola, grasile suryamandala | Vadhata vadhata vadhe, bhedeele
shunyamandala || 13 ||
Dhandhanya
pashuvruddhi, putrapautra samgrahi | Pavti roopvidyadi, stotrapathe karooniya
|| 14 ||
Bhootpreta
samandhadee, rogvyadhee samasthi | Nasti tutati cheenta, aanande bhimdarshane
|| 15 ||
He dhara
pandhara shloki, labhali shobhali bari | Dradh deho nisandeho, sankhya
chandrakala gunen ||16 ||
Ramdasi
agraganyu, kapeekulasee mandanoo | Ramroopi antaratma, darshane dosh nasati ||
17 ||
|| Sri
Marutistotram Sampoornam ||
: To get the best result you should chant Maruti Stotra early morning after taking bath and in front of God Maruti Idol or picture. You should first understand the Maruti Stotra meaning in hindi to maximize its effect.
Benefits of Maruti Stotra?
: Regular chanting of Maruti Stotra gives peace of mind and keeps away all the evil from your life and makes you healthy, wealthy and prosperous.